लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सावध पावलं उचलण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर आज मराठवाड्यातील आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावर बैठक होणार आहे…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये भाजपाला एकही जागा मिळाली नाही त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विशेष रणनीती आखत असून याच पार्श्वभूमीवर भाजपाचे मिशन मराठवाडा पाहायला मिळत आहे या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावर मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यामध्ये कोणत्या पक्षाचं किती बलाबल?
संपूर्ण मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत
मराठवाड्यात भाजपाचे सर्वाधिक म्हणजे 16 आमदार आहेत
शिवसेनेचे 12 काँग्रेसचे आठ आमदार मराठवाड्यामध्ये आहेत
याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8, शेतकरी कामगार पक्षाचा 1 तर राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 आमदार मराठवाड्यामध्ये आहेत