(SANJAY RAUT) मुंबई : पहलगाम हल्ला होऊन १२ दिवस झाले तरीही अजून बदला घेता आला नाही. पाकिस्तानी (PAKISTAN)अधिकारी कमी करणे, युट्युब चॅनल बंद करणे, याला बदला म्हणतात का? असा परखड सवाल करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (SANJAY RAUT) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे.
‘अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू खासदार’ Sanjay Raut यांची पत्रकार परिषद पुण्यातून UNCUT
राऊत (SANJAY RAUT) म्हणाले की, पाकिस्तान(PAKISTAN)च्या या नाड्या आवळल्या, त्या सोडल्या, २१ युट्यूब चॅनल बंद केले, एअरस्पेस बंद केली, हायकमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणे म्हणत नाहीत. तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा कसा बदला घेता, त्यांचे पक्ष फोडता, तुरुंगात टाकता. आयुष्य उद्धवस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता, आपल्यासमोर कोणीही राजकीय शत्रू नको, ही तुमची भावना असते. पाकिस्तान तर आपला शत्रू आहे. मग बदला घ्यायला इतका उशीर का? असा सवाल त्यांनी केला.
लाडकी बहीण योजना बंद व्हायला लागली आहे. निवडणुकीपूर्वी १५०० आणि प्रचारावेळी २१०० देऊ,अशी घोषणा केली आणि देताय किती तर ५०० रुपये ही लाडक्या बहीणींची फसवणूक आहे. अजित पवार म्हणतात, कर्जमाफी आणि लाडक्या बहीणींना २१०० रुपये देतो, असे मी बोललोच नाही, पण शेवटी सरकार तर तुमचेच आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, याचा विसर पडू देऊ नका, असा चिमटा राऊत (SANJAY RAUT) यांनी काढला.
एकनाथ शिंदेंचा एक मंत्री म्हणतो, माझा पैसा वळवला पण तो लाडक्या बहीणीसाठीच दिला ना ? तुम्हाला कशाला हवाय पैसा, असा सवाल त्यांनी केला. लाडक्या बहीणीला पैसा देताना आता रडणारे तेव्हा मतदान मिळावे म्हणून हसत होते. वळवला, तो तुमच्या खिशातील पैसा नाही, सरकारी आहे. हा पैसा वळवून तुम्ही लाडक्या बहीणींना आणि सामाजिक न्याय विभागाला फसवित आहात, असेही राऊत (SANJAY RAUT) यांनी म्हटले.
PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM l युद्धासाठी सैन्य तयार ; सरकारनेच कच खायला नको
Dani Li : बारीक व्हायला गेली अन् जीवानिशी गेली; ‘या’ प्रसिद्ध गायिकेचा धक्कादायक मृत्यू
HOUSE OF ARREST शो बंद करा ; राज्य महिला आयोगाचे पोलिसांना पत्र
Modi Cabinet Minister Portfolios : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर