महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत महायुती सत्तेत आली. तर महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधिमंडळातील गटनेते विधिमंडळ पक्षनेते आणि पक्षप्रतोदांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे, विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव तर पक्षप्रतोदपदी पुन्हा एकदा सुनील प्रभू यांना संधी देण्यात आली