Rohit Pawar

Rohit Pawar : ‘अजितदादांसोबतही तेच घडत आहे’, रोहित पवारांनी दिला भाजप नेत्यांचा दाखला

658 0

अमरावती : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अजितदादांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहेत असं जाणवत आहे. भाजपला लोकनेते पटत नाहीत. भाजप दुसऱ्या पक्षातून नेत्यांना आपल्या पक्षात घेताना अनेक आश्वानं देतं, मात्र त्यानंतर ती आश्वानं पूर्ण केली जात नाहीत. लोकनेत्याची ताकद कमी केली जाते. तेच अजित पवारांसोबत होत आहे’, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
‘अजितदादांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहेत असं जाणवत आहे, भाजपला लोकनेता पटत नाही, त्यांना त्यांच्या पक्षातले सुद्धा लोकनेते पटत नाहीत. लोकनेत्याची ताकद भाजप कमी करते. तीच गोष्ट अजितदादांसोबत देखील होत आहे. पंकजाताई मुंडे,आमदार फुंडकर, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांची ताकद सुद्धा भाजपनं कमी केली’ असा आरोप रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!