राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा (Diwali) सण साजरा करण्यात येत आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने न्यायालयाने फटाके फोडण्याची वेळ ठरवून दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी याचं उल्लंघन होताना दिसत आहे. नुकताच बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट रिलीज झाला. यावेळी काही हुल्लडबाज तरुणांनी चक्क थिएटरमध्येच फटाके फोडून सलमानच्या टायगर 3 चे स्वागत केले. या सगळ्या प्रकारामुळे थिएटरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
चित्रपटगृहात फटाके फोडून चाहत्यांनी सलमानच्या टायगर 3 चे केले स्वागत pic.twitter.com/5dT0ITPazw
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) November 13, 2023
नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा सिनेमागृहात फटाके व आतषबाजी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगावच्या मोहन थिएटरमध्ये सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाच्या शेवटच्या शो दरम्यान हा सगळा प्रकार घडला. पडद्यावर अभिनेत्याची एन्ट्री होताच हुल्लडबाज चाहत्यांनी चक्क चित्रपटगृहातच जोरदार मोठे मोठे फाटके फोडून आतशबाजी सुरु केली. बराच वेळ हा प्रकार सुरु होता. या प्रकारामुळे इतर प्रेक्षकांचा जीव धोक्यात आला होता. या प्रकारामुळे आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी देखील होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने असे काही घडलं नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.