राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाने विधानसभेची तयारी सुरू केली असून या अनुषंगाने शंभर विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांच्या नेमणुका केल्याची माहिती समोर आली आहे..
इच्छुक उमेदवारांचा अहवाल तयार करण्याचे काम निरीक्षकांकडे असणार असून आठ दिवसांमध्ये निरीक्षकांनी अहवाल प्रदेश स्तरावर पाठवण्याच्या सूचनाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे