शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत…
उद्धव ठाकरे यांच्या समवेत रश्मी ठाकरे व माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे देखील दिल्ली दौऱ्यामध्ये असणार आहेत या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहे संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी व अन्य पक्षांचे नेतेही उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून उद्या म्हणजे 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीतील माध्यमांशी संवाद साधणार आहेत.