अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज पुण्यातील आमदारांची बैठक बोलवण्यात आली असून सायंकाळी साडेचार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी बैठक होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी होमग्राउंड असणाऱ्या पुण्यात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केले असून या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील आमदारांची बैठक संपन्न होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीत पुण्यातील जागावाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.