आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आत्तापर्यंत सात उमेदवार जाहीर केले असून आज नागपूर मध्ये बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पुतणे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे विरोधात वरळी मतदारसंघातही उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नवनिर्माण यात्रा सुरू केली असून या यात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये चार तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन उमेदवारांची घोषणा केली.
तर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधातच उमेदवार देण्याची घोषणा केली आहे नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत वरळी मतदारसंघात 37 ते 38 हजार मतं आहेत त्यामुळे या मतदार संघात उमेदवार देणार असं राज ठाकरेंनी म्हटले आहे या सोबतच सर्व मतदार संघ उमेदवार देण्याची घोषणाही राज ठाकरेंनी केली आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर आता मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून राज ठाकरेंच्या या घोषणेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे