कोलकाता अत्याचार प्रकरणातील आरोपी संजय रॉय विरोधातील सर्वात मोठा पुरावा हाती

66 0

कोलकत्यातील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्या विरोधात आणखी काही सबळ पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज सीबीआयने हस्तगत केले असून त्या ठिकाणहून संजय रॉय विरोधातील पुरावे हाती लागले आहेत.

घटनास्थळ असलेल्या सेमिनार रूम जवळील हे सीसीटीव्ही फुटेज असून यामध्ये संजय रॉय आढळून येत आहे. यावेळी आरोपीच्या गळ्यात ब्लूटूथ इयरफोनही दिसून येत आहेत. दरम्यान संजय रॉय यांनी आपला गुन्हा कबूल केल्यामुळे सध्या तो सीबीआयच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीतून संजय रॉय याने सुरुवातीला आपला पुन्हा कबूल केला होता. मात्र त्यानंतर ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे. त्यामुळे माझी पॉलीग्राफी चाचणी करा त्यातून माझे निर्दोषत्व सिद्ध होईल’, असे आरोपी म्हणाला होता.

सीबीआयने शुक्रवारी संजय रॉय याला सियालदह न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी त्याला तो पॉलीग्राफी चाचणीसाठी तयार का झाला? त्याने संमती का दिली? ते विचारले असता तो रडू लागला. ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे. त्यामुळे माझी पॉलीग्राफी चाचणी करा त्यातून माझे निर्दोषत्व सिद्ध होईल’, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे आज त्याची पॉलीग्राफी टेस्ट होण्याची शक्यता आहे.

यादरम्यान सीबीआयने सेमिनार हॉलच्या दिशेने जात असलेल्या संशयीतांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यामध्ये हॉलच्या दिशेने संशयीत जात होता तो संजय रॉय होता. संजय रॉय नंतर तीन ते साडेपाच या वेळेत दुसरा कोणीही संशयित व्यक्ती सेमिनार हॉल कडे जाताना दिसलेला नाही. जे लोक जाताना दिसले ते चार ते पाच मिनिटांच्या आत आपली कामे करताना दिसून आले. त्यामुळे संजय रॉय हा एकटाच सेमिनार हॉलमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबलेला आढळून आला. त्याचबरोबर त्याचा ब्लूटूथ हेडफोन देखील सेमिनार हॉल मधूनच जप्त झाला होता. त्यामुळे आरोपी बऱ्याच काळ तिथे थांबला होता हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आणखी सबळ पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याने तपासाला वेग आला आहे.

Share This News

Related Post

परवाना नसताना रॅपिडो कंपनीने सुरू केली बाईक आणि टॅक्सीसेवा; बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - November 25, 2022 0
पुणे : पुण्यातील रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सुयश प्लाझा, भांडारकर रोड या कंपनीने महाराष्ट्र राज्याच्या अथवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा…

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू,12 तासाच्या आत पोलीसांनी आरोपींना घेतलं ताब्यात; हत्येचा कारण नेमकं काय होतं?

Posted by - September 2, 2024 0
पुणे: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या गोळीबार प्रकरणी आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पुणे पोलिसांकडून आरोपींना…
Satara Crime

Satara Crime : साताऱ्यात तलावात उडी घेणाऱ्या ‘त्या’ प्रेमीयुगुलाला शोधण्यात शिवेंद्रराजे ट्रेकर्सला यश

Posted by - October 2, 2023 0
सातारा : सातारा (Satara Crime) तालुक्यातील कोंडवे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये एका प्रेमीयुगुलाने तलावात उडी मारून…

विक्षिप्तपणाचा कळस : ‘त्या’ दिवसातल्या रक्तासाठी कुटुंबानेच उतरवले कपडे; सुनेचे अक्षरशः हाल; महिला दिनाच्या दिवशी दाखल झालेल्या या तक्रारीने महाराष्ट्र हादरला

Posted by - March 10, 2023 0
बीड : बीडमध्ये अक्षरशः संताप होईल अशी एक घटना घडली आहे. या विवाहितेने चार वर्ष अतोनात हाल सोसले. पती कमवत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *