मुंबई : नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 48 खासदार निवडून आले. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर, महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत.सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे,आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत.
मात्र, या 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, या सर्वच आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांचा राजीनामा बाकी आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nagpur Blast : नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत भीषण स्फोट; 5 जण ठार
Chandani Chowk Accident: चांदणी चौकात एसटी बसचा भीषण अपघात
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?
Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम
Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे
Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत
Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार