Rahul Gandhi

Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार

320 0

पुरी : गुजरातमध्ये सूरत आणि मध्य प्रदेशातील इंदौरनंतर आता आणखी एका ठिकाणी (Loksabha Election) काँग्रेसला धक्का बसला आहे. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने पैसे नसल्याचं कारण देत पक्षाने जाहीर केलेले तिकीट नाकारलं आहे. ओडिशातील पुरी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी हे तिकीट नाकारलं आहे. त्यांच्याविरोधात भाजपने दिग्गज नेते संबित पात्रा यांना तिकीट जाहीर केले होते. काँग्रेस उमेदवार मोहांती यांनी माघार घेतल्याने संबित पात्रा यांच्यासाठी ही निवडणूक आता सोप्पी झाली आहे.

‘या’ कारणामुळे घेतली माघार
पुरीमधून काँग्रेसचं तिकीट परत देणाऱ्या मोहांती यांनी सांगितलं की, पक्षाकडून निधी मिळत नाहीय. अशा स्थितीत माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत. सुचारिता यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल राव यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यात पक्षाकडून निधी न मिळाल्याने प्रचार करू शकत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

याआधी सूरतमध्ये काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभनी यांचा अर्ज रद्द ठरला होता. याशिवाय इतर उमेदवारांनी माघार घेतल्यानं भाजपच्या मुकेश कुमार यांना विजयी घोषित करण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!