ठाण्यात 12 एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधे राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे.
मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे.
करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा pic.twitter.com/KwXm9mbsKM
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 9, 2022
गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच त्यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला हात घातला. आता 12 तारखेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.