राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
आता या प्रकरणी मुंबईतील किला न्यायालयाने सदावर्तेना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आज सकाळी सदावर्तेंना मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आले होते. महेश वासनीस यांनी सदावर्तेंची बाजू मांडली.
ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.