मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरे ची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं होतं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण देखील केलं.
सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंतचा विराट मोर्चा देखील काढला मात्र वाशीमध्ये हा मोर्चा असताना राज्य सरकारने सगळे सोयरे ची अंमलबजावणी करण्यासंदर्भातला अध्यादेश काढला मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात असल्याचं पाहायला मिळत आहे…
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसल्याचा पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानातच उतरण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केले असून तब्बल 900 इच्छुक उमेदवारांचे अर्ज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटलांकडून निवडणूक लढवण्यासाठी सात जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
5 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठका देखील सुरू होणार असल्याचे पाहायला मिळत आहे