गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress News) पक्षाला एका मागे धक्के बसत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यानंतर आता आणखी एका बड्या नेत्याने काँग्रेसचा हात सोडला आहे. यामुळे काँग्रेसला गडचिरोलीमध्ये मोठा धक्का बसला आहे.
गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
डॉ. नामदेव उसेंडी यांची कारकीर्द
डॉ. नामदेव उसेंडी हे 2008 पासून काँग्रेसमध्ये कार्यरत करत असून 2009 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसतर्फे त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली मात्र दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या निवडणुकीतही डॉ. नामदेव उसेंडी इच्छुक होते. मात्र गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. यामुळे डॉ. नामदेव उसेंडी यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ajit Pawar : अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, पुण्यामध्ये केली मोठी घोषणा
Pune News : ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान
Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती
Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा
Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू