बारामती : बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे हे बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर (Maharashtra Politics) ठाम असतानाच आता ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी बहूजन आघाडी पक्ष देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ओबीसी बहूजन पक्षाकडून महेश भागवत हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. यामुळे आता दोन्ही पवारांच्या समोरचे टेन्शन वाढलं आहे.
बारामतीमध्ये साडेपाच लाख असं मतदान आहे, ज्यांना दोन्ही पवारांना मतदान करायचं नाहीये, मी त्यांचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी म्हटलं होतं. विजय शिवतारे यांच्यासोबतच ओबीसी बहुजन पक्षाकडून महेश भागवत हे देखील निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता भावजयी विरोधात नणंद असा सामना रंगणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू