Amravati Accident

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

549 0

अमरावती : अमरावतीमधून (Amravati Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कारचं टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही कार अकोल्याहून अमरावतीला जात होती. या दरम्यान हा अपघात झाला.

काय घडले नेमके?
ही कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. याचदरम्यान भातकुली गावाच्या परिसरात भरधाव कारचे टायर फुटल्यानं हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. तसेच या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमी व्यक्तींना उपचारासाठी अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

कलीम खान सलीम खान (वय 36), सलीम खान मेहमूद खान (वय 65) आणि रुबीना परविन कलीम खान (वय 32) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर रिजवान, नदीम, जारा परवीन ही तीन मुलं आणि मोहम्मद शकील हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Phalakasana : फलकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Black Magic in pune: आयटी कंपनी संचालकाच्या घराबाहेर करणी करण्याचा प्रकार

Posted by - September 9, 2024 0
पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुसंस्कृत पुण्याला अजूनही अंधश्रद्धेचा विळखा बसलाय असं म्हणण्यासारखी एक घटना समोर आली…
Ratnagiri Crime

धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 20, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.…

BREAKING NEWS| सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता गॅंगचा हल्ला; पुणे शहरात खळबळ

Posted by - August 25, 2024 0
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा प्रमाण वाढत असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात चक्क पोलीस कर्मचाऱ्यावरच कोयता गॅंग ने…
Road Accident

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - March 4, 2024 0
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील जनपद बुलंदशहरमधून एक भीषण अपघाताची (Road Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये लग्नाला जात असताना वऱ्हाडाची…
Nanded Crime

सख्खा भाऊ पक्का वैरी ! ‘या’ शुल्लक कारणातून भावानेच केली भावाची हत्या

Posted by - June 4, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली होती. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) गेलेल्या एका 62…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *