jitendra awhad

‘The Kerala Story’ Movie : जितेंद्र आव्हाडां विरोधात गुन्हा दाखल, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवले

666 0

मुंबई : सध्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून ( ‘The Kerala Story’ Movie) राज्याचे राजकारण तापताना दिसत आहे. सध्या राज्यातील नेते या चित्रपटावरून आरोप- प्रत्यारोप, बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून एक वक्तव्य केले आहे. ते वक्तव्य आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 500 अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारत त्यांनी निर्मात्याला सार्वजनिकरित्या फाशी देण्याची मागणी केली. ‘द केरळ स्टोरी’च्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. तिघांचा अधिकृत आकडा 32,000 असा अंदाज होता. ज्या व्यक्तीने हा काल्पनिक चित्रपट तयार केला त्याला सार्वजनिक फाशी देण्यात यावी असे वक्तव्य केले.

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा; चित्रा वाघ यांची मागणी

त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात (Vartak Nagar Police Station) आयपीसी कलम 500 अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!