मुंबई : कांजूर मार्गामध्ये मेट्रोची कार शेड केली जात होती. ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती . त्यांच्या या टीकेनंतर शिवसेना आमदार सुनील राऊत यांना सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे .
अधिक वाचा : VIDEO : खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी सुनील राऊत म्हणाले की , ” उद्धव ठाकरेंना इगो नव्हता ,तर इगो फडणवीस यांनाच आहे . उद्धव साहेबांनी खूप चांगला डिसिजन घेतला होता. झाडे कापून चालणार नाही. मुंबईमध्ये झाडे कमी इमारती जास्त आहेत . त्यामुळे आरे मधील झाडे वाचवणे आवश्यक आहे. कारण एक झाड म्हणजे एक जीव आहे . म्हणून हजारो झाडे कापण्यापेक्षा कांजूरमार्ग मधील जमीन पडलेली आहे . हा सरकारी भूखंड आहे. त्यामुळे तिथेच कारशेड व्हावी . त्यामुळे आरे येथील झाडांची कत्तल होणार नाही . त्यासह मुंबईकरांना एक चांगलं जंगलही मिळेल .
म्हणूनच हा इगो उद्धव साहेबांचा नाही तर हा इगो त्यांचा आहे .असं प्रत्युत्तर सुनील राऊत यांनी केला आहे.