नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून पंजाबमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे.
पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव झाला आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेस मधील अंतर्गत वाद उफाळून आला होता त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धू मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते