पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल

416 0

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मुलगा व्हावा म्हणून सुनेचा जादूटोणा करून छळ केल्या प्रकरणी सुर्यकांत काकडे, सुर्यकांत काकडे कुटुंबीय आणि मांत्रिक कृष्णा गुरुजी यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका 24 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारी वरून सूर्यकांत काकडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यातील फिर्यादी महिलेला मुलं व्हावं म्हणून पीडित महिलेच्या बेडखाली तिचं नाव लिहिलेला मंत्र-तंत्र करून लिंबू ठेवण्यात आला. मांत्रिकानं मंतरून दिलेलं अस्वच्छ, बेचव, काळं पाणी पिण्यास तिला भाग पाडण्यात आलं.

सूर्यकांत काकडे यांच्या मुलाचं पहिलं लग्न झाल असताना पीडित आणि तिच्या कुटुंबीयांपासून पहिल्या लग्नाबद्दलची माहिती लपवून ठेवण्यात आली, असं पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

Share This News

Related Post

Cockroaches

Cockroaches : कोंबड्याप्रमाणे ‘या’ ठिकाणी पाळली जातात झुरळं; पौष्टिक म्हणून लोक आवडीने खातात

Posted by - July 16, 2023 0
नवी दिल्ली : आपण आतापर्यंत कुत्रा, मांजर, कोंबड्या पाळल्याचे ऐकले किंवा पाहिले असेल. पण जगामध्ये असे एक ठिकाण आहे ज्या…

CM EKNATH SHINDE : दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवरती होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा होती. दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ…
Ruchesh Jaywanshi

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

Posted by - June 7, 2023 0
सातारा : साताऱ्याचे (Satara) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Ruchesh Jayavanshi) यांची अचानक राज्य सरकारने बदली (Transfer) केली आहे. महाबळेश्वर पाचगणी कास…
Manoj Jarange

Manoj Jarange : ’24 तारखेपर्यंत वेळ, संयमाचा अंत पाहू नका’; राजगुरूनगरमध्ये जरांगे पाटील नेमके काय म्हणाले?

Posted by - October 20, 2023 0
पुणे : आज पुण्यातील राजगुरूनगर या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची सभा सुरु आहे. या सभेमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *