नांदेडचे खासदार वसंत चव्हाण याचं निधन झालं आहे, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली, आज पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला होता. तसंच, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता.
वसंत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द कशी होती
15 ऑगस्ट 1954 रोजी वसंत चव्हाण यांचा जन्म
1987 साली नायगाव ग्राम पंचायतीचे सरपंच , 24 वर्ष सरपंच
1990 – जिल्हा परिषद सदस्य
2002 राष्ट्रवादीकडून विधान परिषद सदस्य
2009 ला नायगाव विधानसभेतून अपक्ष आमदार
2014 ला काँग्रेस कडून नायगावचे आमदार
2024 मध्ये काँग्रेस कडून लोकसभेवर