देशासह राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढत असतानाच बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारामुळे महाराष्ट्र पेटून उठला असतानाच आता अशाच एका नराधमाने साडेतीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना नाशिकच्या मनमाड मध्ये घडली असून याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 19 वर्षे तरुणाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मनमाड भागातील शांतीनगरमध्ये संबंधित आरोपी हा भाड्याने एका घरात राहतो. हर्षल भालेराव, असे या आरोपीचे नाव आहे. याच घरमालकाच्या साडेतीन वर्षांच्या मुलावर त्याने लैंगिक अत्याचार केले. आपल्याबरोबर नेमके काय घडले आहे याबाबत चिमुकल्याला समजलेही नाही. मात्र त्याला प्रचंड त्रास झाल्याने त्याच्या घरच्यांच्या ही गोष्ट लक्षात आली.
पीडित मुलाच्या वडिलांनी तात्काळ पोलिसात धाव घेत या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी या तरुणाला आता अटक केली आहे.