राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्या जनसमान यात्रा सुरू असून महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही जनसमान यात्रा जाणार आहे.
या यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाचे सर्वत्र मोठी चर्चा पाहायला मिळते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ह माझीच चूक होती असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनी सोबत बोलताना केला आहे.
अजित पवार म्हणाले की सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना यांना उतरवणं ही माझी चूक होती मात्र पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला एकदा बाण सुटला की सुटला मात्र माझं मन मला आजही सांगतात की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायला नको होती