बांगलादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान असणाऱ्या शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडलं व त्या भारतामध्ये आल्या. त्यानंतर आता शेख हसीना यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला असून बांगलादेश मध्ये असणारं सेंट मार्टिन बेट अमेरिकेला वापरण्यासाठी दिल्या नाही आणि म्हणूनच अमेरिकेने मला सत्तेतून हटवलं असं शेख हसीना म्हटले आहे. ज्या सेंट मार्टिन बेटामुळे शेख हसीना यांना आपली खुर्ची गमवावी लागली ते हे सेंट मार्टिन बेट काय आहे पाहुयात…
सेंट मार्टिन हे बांगलादेशमधलं एकमेव कोरल रीफ बेट आहे. बांगलाच्या खाडीतील उत्तर पूर्व भागात हे बेट आहे. या बेटाचा आकार फक्त 3 चौरस किलोमीटर आहे. या बेटाला नारिकेल जिन्जीरा म्हणजेच नाराळाचं बेट म्हणूनही ओळखलं जातं. सेंट मार्टिन बेट कॉक्स बाजार-टेकनाफ बेटापासून जळपास 9 किलोमीटर दक्षिणेला आहे. म्यानमारच्या वायव्य किनाऱ्यापासून हे फक्त 8 किलोमीटर पश्चिमेला आहे. हे बेट 1900 साली ब्रिटीश इंडियाचा भाग होतं. 1937 साली म्यानमार भारतापासून वेगळं झालं. त्यावेळी हे भारताचा भाग बनलं. 1947 साली भारताची फाळणी झाली. त्यावेळी हे बेट पाकिस्तानात गेलं. त्यावेळी बांगलादेश देखील पाकिस्तानचा भाग होता. 1971 साली पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळं झालं. त्यावेळी हे बेट बांगलादेशला मिळालं. बांगलादेश आणि म्यानमारमध्ये 1974 साली या बेटाबाबत एक करार झाला. त्यामध्ये हे बेट बांगलादेशचा भाग असल्याचं निश्चित झालं.