बारामतीत भाकरी फिरणार; अजित पवारांनी दिले कार्यकर्त्यांना राजीनामे देण्याचे आदेश

138 0

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेश दिले. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांच्या या आदेशामुळे आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून बारामतीत भाकरी फिरवली जाणार आहे.

आज म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी बारामतीत आयोजन करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितले. लवकरात लवकर आत्ताच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन १५ ऑगस्टपूर्वी पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने नव्या चेहऱ्यांना आणि निष्ठावंताना संधी देणार असल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले, आपल्याच स्टेजवर बसायचे आणि आपलाच कार्यक्रम करायचा असे चालले आहे. अनेक कार्यकर्ते मला म्हणाले, दादा तुमचा म्हणवला जाणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही. आपण यांना एवढे दिले आणि काम मात्र चुकीचे करायचे. अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, हे चालणार नाही. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आत्मपरिक्षण करावे. आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या स्वतःच्या वोटिंग बुथवर जिथे आपले मतदारयादीत नाव आहे, तेथे तरी आपल्या पक्षाला मताधिक्य मिळाले का ?. आपल्या पक्षाला मताधिक्य का मिळाले नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी 15 ऑगस्ट पूर्वी नवीन पदाधिकारी आणि कार्यकारणी निवडणार असल्याचे सांगितले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!