अमेरिकेत बेपत्ता झालेला आपला मुलगा सुखरूप सापडेल या आशेवर असणाऱ्या आई-वडिलांना मुलाच्या मृत्यूची बातमी कळली आणि खूप मोठा धक्का बदला. अमेरिकेत पुण्यातील सिद्धांत पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील नॅशनल पार्कमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता आणि चार आठवड्यानंतर त्याचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
सिद्धांत मूळचा पुण्याचा होता पण 2020 पासून तो अमेरिकेत राहत होता. तो कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिसमधून एमएस ते शिक्षण घेत होता. सिद्धांत त्याच्या काही मित्रांसह रॉकी माऊंटनमधील उद्यानात फिरायला गेला होता. त्याने उद्यानात फिरताना आईला फोन केला. आपण आपल्या इतर सहा भारतीय मित्रांसह फिरण्यासाठी बाहेर आलेलो आहोत, असे त्यांनी सांगितले. त्याने आईला मेसेज देखील केला होता की तो तीन दिवसांत सॅन जोसला परतणार आहे. पण यावेळी तो हिमस्खलन खाडीत पडला होता. सिद्धांतचा शोध घेण्यात अमेरिकन प्रशासन दिरंगाई करत आहे, असा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला होता. सिद्धांच्या वडिलांनी अमेरिकेतील तपास यंत्रणांनी त्वरित सिद्धांचा शोध घ्यावा अशी विनंती शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केली होती.
मात्र अखेर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. ग्लेशियर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या शोध कार्यानंतर, नॅशनल पार्कमधील रेंजर्सने सिद्धांत विठ्ठल पाटीलचा मृतदेह बाहेर काढला आहे. घटनेच्या वेळी त्याने घातलेले केलेले कपडे देखील जप्त करण्यात आले आहेत. आज सकाळच्या सुमारास, एका व्यक्तीने घाटाच्या खाली एक मृतदेह दिसल्याची माहिती दिली. त्यानुसार रेंजर्सनी तातडीने तेथे जाऊन शोध घेतला असता सिद्धांचा मृतदेह आढळून आला. ज्यामुळे पुण्यातील त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.