राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत.
या प्रकरणी आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.
गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज झालेल्या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यामुळे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्यामुळे आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गावदेवी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्या घरी गेले. एसीपी पांडूरंग शिंदे यांनी बिल्डिंगखालून त्यांना कॉल केला असता सदावर्तेंनी त्यांना वरती बोलावले. त्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं.
#UPDATE | After one hour of interrogation, Gamdevi Police arrested ST Employees Union's Adv. Gunaratna Sadavarte. A case has been registered against him under Section 120-B and Section 353 of IPC, police said
— ANI (@ANI) April 8, 2022