पिंपरी-चिंचवड: लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक नेते सोडचिठ्ठी देत असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अजित मोरेश्वर गव्हाणे यांनी 14 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता.
त्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरातूनच अजित पवार यांना दुसरा मोठा धक्का बसण्याच्या तयारी असून आणखी एक शिलेदार अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, भाऊसाहेब भोईर अजित पवार यांची साथ सोडणार असल्याचं बोललं जात असून आज सायंकाळी पाच वाजता भाऊसाहेब भोईर यांनी निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
2022 मध्ये झालेल्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र मी सर्वे मध्ये बसत नसल्याचा कारण देत आपली उमेदवारी नाकारली असल्याचं भाऊसाहेब भोईर यांनी म्हटल आहे यासोबत मागील वीस वर्षांपासून सातत्याने आपल्यावर अन्याय होत असल्याचं देखील भाऊसाहेब भोईर यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आजच्या निर्धार मेळाव्यानंतर भाऊसाहेब भोईर हे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे