विधानसभा निवडणूकीत रोहित पवार, राजेश टोपेंसह ५० उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे, असं विधान ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही मतदान का करायचं?असा सवालही त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 50 उमेदवार कोणते पाडायचे हे आमचं ठरलं आहे. 50 उमेदवारांची यादी तयार आहे. ज्यांनी जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पाडणार. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार. त्यासाठी लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल असा इशाराही यावेळी लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.