पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पुणे शहरातील बावधन मध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात घडला आहे
प्रीतम भारद्वाज,गिरीश पिलाई, परमजीत सिंग अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नाव असून यातले दोन वैमानिक होते आणि एक इंजिनियर होते या या तिघांचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.