Exit Poll Lok Sabha Election

Loksabha Election Result : महाराष्ट्रातील संपूर्ण 48 विजयी उमेदवारांची यादी

785 0

पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं होतं. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. चला तर मग 48 मतदार संघातून कोण विजयी झाले आहेत चला जाणून घेऊया…

1) मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत विजयी
2) पालघर मधून हेमंत सावरा विजयी
3) रायगड मधून सुनील तटकरे विजयी
4) कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विजयी
5) नंदुरबार मधून गोवाल पाडवी विजयी
6) ठाण्यामधून नरेश मस्के विजयी
7) दक्षिण मध्य मुंबई मधून अनिल देसाई विजयी
8) सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी
9) शिर्डी मधून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी
10) अमरावती मधून बळवंत वानखेडे विजयी
11) धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर विजयी
12) बारामती मधून सुप्रिया सुळे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी
13) लातूर मधून डॉ.शिवाजीराव काळगे विजयी
14) पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी
15) मावळमधून श्रीरंग बारणे विजयी
16) नागपूर मधून नितीन गडकरी विजयी
17) शिरूर मधून अमोल कोल्हे विजयी
18) रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे विजयी
19) गडचिरोली मधून नामदेव किरसान विजयी
20) बुलढाणा मधून प्रतापराव जाधव विजयी
21) मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर विजयी
22) उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड विजयी
23) ईशान्य मुंबई मधून संजय दिना पाटील विजयी
24) साताऱ्यामधून छत्रपती उदयनराजे भोसले विजयी
25) चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर विजयी
26) अकोल्यातून भाजपाचे अनुप धोत्रे विजयी
27) कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयी
28) सोलापूरमधून प्रणिती शिंदे विजयी
29) छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे विजयी
30) माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील विजयी
31 ) दिंडोरीमधून भास्कर भगरे विजयी
32) हातकणंगलेमधून धैर्यशील माने विजयी
33) यवतमाळमधून संजय देशमुख विजयी
34) धुळ्यातून शोभा बच्छाव विजयी
35) परभणीमधून संजय जाधव विजयी
36) नांदेडमधून वसंत चव्हाण विजयी
37) हिंगोलीमधून नागेश आष्टीकर विजयी
38) अहमदनगरमधून निलेश लंके विजयी
39) भिवंडीमधून सुरेश म्हात्रे विजयी
40) नाशिकमधून राजाभाऊ वाजे विजयी
41) रावेरमधून रक्षा खडसे विजयी
42) जळगावमधून स्मिता वाघ विजयी
43) उत्तर मुंबईमधून पियुष गोयल विजयी
44) रामटेकमधून श्यामकुमार बर्वे विजयी
45) वर्ध्यातून अमर काळे विजयी
46) जालन्यामधून कल्याणराव काळे विजयी
47) भंडाऱ्यातून प्रशांत पडोले विजयी
48) बीडमधून बजरंग सोनावणे यांचा विजय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!