पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील प्रति पंढरपूर मंदिराला भेट देऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर कडव्या भाषेत टीका केली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की,”बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तर अधिकारी ठरवला होता. त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्यासारखा आहे. सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसते आहे. फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजाराची दाढी करत आहे. यामध्ये सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी भरडला जात आहे. या सरकारला सर्वसामान्यांचे काही देणंघेणं नाही,असे म्हणून शिंदे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे.” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
“शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि यापुढेही देत राहणार आहोत. अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे विठ्ठलाचे आशीर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आज प्रति पंढरपूर मंदिराला भेट दिली आहे. “हे सरकार अस्थिर आहे असे दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सुरत,गुवाहाटी,गोवा फिरून आले. भारत दर्शन करून झाले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते हे दुर्दैवी आहे.”अशी खंत देखील सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
