राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासह प्रमुख विषयांवर चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळते.
मात्र अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मोकळे असे म्हणतात पंचवीस जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे दिल्लीतील 7d मोतीलाल चौक या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी रात्री बारा वाजता केले आणि या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. 5 ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटले. तर लगेच म्हणजे सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे कोणाला भेटले आणि नेमकी काय चर्चा झाली हे जाहीर करावं असंही म्हटलं आहे.