राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वीच भाजपाला सोडचिठ्ठी देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला तर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबागेत भेट घेतली. रवी लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत नेमके हे रवी लांडगे आहेत कोण पाहूया ‘TOP NEWS मराठी’च्या या स्पेशल रिपोर्टमधून…
2022 मधील महानगरपालिकेमधील कार्यकाळ संपल्यानंतर रवी लांडगे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा रंगली असतानाच मधल्या काळात रवी लांडगे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा बोलला जात होतो लोकसभा निवडणुकीवेळी ही रवी लांडगे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार केला. मात्र लोकसभा निवडणूक होतात रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाट निवडली आणि मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश केला.
रवी लांडगे यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
- रवी लांडगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र तर भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष स्व.अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत.
- घरातूनच राजकीय वारसा मिळाल्याने रवी लांडगे हे राजकारणात सक्रिय झाले.
- 2017 मध्ये रवी लांडगे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते
- दोन वर्षांपूर्वीच रवी लांडगे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असून त्यांना आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात भोसरी विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान रवी लांडगे यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्यानं भोसरी विधानसभेतून महेश लांडगे यांच्या विरोधात रवी लांडगे हेच उमेदवार असतील अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.