महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी केली असून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 32 उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात तर कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधातही उमेदवार देण्यात आला आहे.
दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात सुनील इंदोरे यांना तर कामठी विधानसभा मतदारसंघातून गणेश मूलदियार यांना उमेदवारी देण्यात आले आहे तर प्रकाश सोळंके यांच्या विरोधात श्रीराम बादाडे यांना उमेदवारी देण्यात आली असून भोकर मधून श्री जय अशोक चव्हाण यांच्या विरोधात साईप्रकाश जाटलवार यांना उमेदवारी देण्यात आले आहे.