राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात तात्पुरते संघटनात्मक बदल; अंकुश काकडे प्रभारी तर विशाल तांबेंकडे मुख्य समन्वयक पदाची जबाबदारी

870 0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर समन्वय समितीची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या काळासाठी शहर संघटनेत काही तात्पुरते बदल तर काही आवश्यक नियुक्त्या करण्यात आल्या.

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे स्वतः हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच विशाल तांबे यांची शहर मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत पक्षाच्या वतीने निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून ही तात्पुरती व्यवस्था विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत कायम असेल अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.
या बैठकीस प्रशांत जगताप यांच्यासह माजी खासदार सौ. वंदनाताई चव्हाण, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, रविंद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के, बापूसाहेब पठारे, विशाल तांबे उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!