महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत कुडाळ मतदार संघातून निलेश नारायण राणे रिसोड मतदारसंघातून माजी खासदार आणि विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार भावना पुंडलिकराव गवळी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदारसंघातून मिलिंद मुरली देवरा तर पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून विजय सोपानराव शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली .
यासोबतच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंबरनाथ मधून बालाजी किनीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे