राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून वंचित बहुजन आघाडीनं लोकसभेत नंतर विधानसभेतही ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला पाठिंबा देईल अशा चर्चा होत्या मात्र वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे सात जागांची मागणी केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही मागणी मान्य न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि 35 जागी उमेदवार उभे केले तर सात जागी अन्य पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं मात्र अखेर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं असून विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित कुणाकडे जाणार नाही मात्र कुणाला आमच्याकडे यायचं असेल तर आमचे दरवाजे उघडे असतील असं विधान केलं आहे.