पुणे शहरातील 8 मतदारसंघात 41 इच्छुक उमेदवार
शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेसाठी जय्यत तयारी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत.
दिनांक 10 सप्टेंबरपर्यंत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून तब्बल 41 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
कोणत्या मतदारसंघातून कोण इच्छुक?
हडपसर विधानसभा
- प्रशांत जगताप
- प्रवीण तुपे
- योगेश ससाणे
- सुनिल उर्फ बंडू गायकवाड
- निलेश मगर
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
- रमेश दत्तात्रय आढाव
- सुनिल बबन खांदवे
- नीता गलांडे
- अर्जुन ज्ञानोबा चव्हाण
- मेघा समीर कुलकर्णी
- भीमराव वामनराव गलांडे
- आशिष ज्ञानदेव माने
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
- उदय प्रमोद महाले
- किशोर कल्याण कांबळे
- श्रीकांत पाटील
- ॲड. निलेश निकम
- ॲड. सुकेश पासलकर
- ॲड. औदुंबर खुणे पाटील
- अरुण पंढरीनाथ शेलार
- किसन धोंडीबा गारगोटे
खडकवासला विधानसभा मतदारसंघ
- राहुल बाबासाहेब घुले
- सुरेखा रमेश दमिष्ठे
- अनिता तुकराम इंगळे
- सोपान उर्फ काका चव्हाण
- कुलदीप गुलाब चरवड
- किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे
- सचिन दोडके
- नवनाथ पारगे
- खुशल करंजावणे
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
- किशोर कुमार सरदेसाई
- नितीन रोकडे
- कणव वसंतराव चव्हाण
- नरेश पगडाल्लू
पर्वती विधानसभा मतदारसंघ
- सचिन तावरे
- फारुख बाशीर शेख
- नितीन मधुकर कदम
- अश्विनी नितीन कदम
कोथरूड विधानसभा मतदारसंघ
- किशोर हनमंत कांबळे
- संदीप बालवडकर
- स्वप्नील देवराम दुधाने
कसबा विधानसभा मतदारसंघ
- रविंद्र माळवदकर
लवकरच या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.