आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत असतात पण प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते त्याचा आपण कधी विचार केला आहे का? एक सरळ सोप्पे उदाहरण घेऊ.. आपण सगळ्यांनी पिझ्झा पाहिलाच असेल. अनेक लोकांना पिझ्झा खायला आवडतो. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का कि, पिझ्झा गोल असतो मग त्याचा बॉक्स चौकोनी का? याचे उत्तर कित्येक जणांना माहीतच नसते. चला तर मग आज जाणून घेऊया यामागचे कारण…
तज्ञांच्या मते, गोल पिझ्झाचे बॉक्स चौकोनी बनवले जातात, याची अनेक कारणे आहेत. पहिले आणि मुख्य कारण म्हणजे कंपनीला गोल आकाराच्या तुलनेत चौरस आकाराचे डबे बनवणे खूप सोपे आहे. गोलाकार बॉक्स बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि खर्चही खूप लागतो. याशिवाय अजून एक कारण म्हणजे चौकोनी बॉक्स सहज वापरता येतो. त्याची पकड गोलाकार बॉक्सच्या तुलनेने सोपी आहे. अजून एक कारण म्हणजे जर बॉक्स गोल असेल तर तो पॅक करणे खूप कठीण असते. उलट चौकोनी बॉक्सचे पॅकिंग लवकर होते. त्यामुळे आता तुम्हाला समजले असेल पिझ्झा बॉक्स चौकोनी का बनवला जातो ते…