Breaking News

पंतप्रधानांच्या पुणे दौरा पार्श्वभूमीवर काळे कपडे घालून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

524 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदींच्या हस्ते होत असलेल्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादीने विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुक आंदोलन केले.

पुणे मेट्रोच्या अर्धवट कामाचे निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन पार पडत आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदींच्या हस्ते महापालिकेच्या आवारातील पुतळ्याचे अनवारण होत आहे. तसेच, छत्रपती शिवराय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संतापजनक विधाने करणाऱ्या राज्यपालाची या कार्यक्रमाला असणारी उपस्थिती या सर्वांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अलका चौकात मुक आंदोलन केले.

यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी काळे कपडे घातले होते.मोदी आता मेट्रोचे उद्घाटन नाहीतर फुलराणीचे उद्घाटन करायला आले आहे. कारण की ही मेट्रो सुद्धा फक्त पाच किलोमीटर साठीच आहे. अशा छोट्या कामासाठी मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाचा मान राखला नाही हे दिसून येते, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे. तसेच, मोदींचा या दौऱ्याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला काही फायदा होणार नाही. असेही जगताप यावेळी म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!