पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण केल्याच्या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पुणे मेट्रोचे एकूण अंतर हे 32.2 किलोमीटर आहे.आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 किलोमीटरच्या पट्ट्यात प्रवास केला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचा प्रवास गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा केला. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती आपल्यासोबत अशी गप्पा मारते, हे पाहून विद्यार्थीही भारावून गेले.
https://youtu.be/bMxGXw43H2g