पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम वजनाची व साडे नऊ फूट उंची असलेल्या मेटलच्या भव्य पुतळयाचे अनावरण ही करण्यात आले.
मोदींनी सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं.तब्बल ६० वर्षांनंतर पुणे महापालिकेत आलेले मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.यावेळी महापौर मुरलीधर मोहळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याची प्रतिकृती पंतप्रधानांना भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याच्या अनावरणावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
https://youtu.be/bMxGXw43H2g