भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

142 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत त्यांनी चक्क राज्यपालांची तक्रार थेट मोदींनाच केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीसांच्या नंतर अजित पवार यांनी जनतेला संबोधन केलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आठ दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱ्यात “चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है”, असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावरून विरोध करण्यात आला.

‘मला पंतप्रधान यांना लक्षात आणून द्यायचं आहे की, काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे. शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा मोठा वारसा आहे, त्याचे पालन केले पाहिजे. तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे. याबद्दल मनात आकस न ठेवता वारसा पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भर सभेत तक्रार केली.

https://youtu.be/bMxGXw43H2g

Share This News

Related Post

नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर असलेले अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे आवाहन

Posted by - November 23, 2022 0
पुणे : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील नवीन कात्रज…

आज सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरात ‘या’ स्थानावर ठेवा ‘धने’; सात पिढ्यांचा होईल उद्धार…!

Posted by - October 24, 2022 0
आज लक्ष्मीपूजन आहे माता लक्ष्मीची सर्वांवर कृपा राहावी धनधान्य,संपत्ती,ऐश्वर्या,प्रतिष्ठा,संतती सर्वांच्या रूपाने सर्वांचे घर भरलेले राहावे असा आशीर्वाद आज प्रत्येक जण…

गोदामात लपवून ठेवलेला रक्तचंदनाचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त, अहमदनगर पोलिसांची कारवाई

Posted by - June 4, 2022 0
अहमदनगर – नगर एमआयडीसीमधील एका गोदामातून लपवून ठेवलेला साडेसात टन रक्तचंदनाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या रक्तचंदनाची किंमत सुमारे…
Latur News

Latur News : लातूर हादरलं ! पैशापायी नवऱ्याने गर्भवती पत्नीलाच संपवले

Posted by - October 8, 2023 0
लातूर : लातूरमधून (Latur News) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे…

‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून संपन्न ; जगभरातून हजारो गणेशभक्तांनी घरबसल्या घेतला सांगता मिरवणुकीचा आनंद

Posted by - September 10, 2022 0
पुणे : मोरया, मोरया… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *