पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळील मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींची आज एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा देखील पार पडली.
यावेळी जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले
* आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही. पण, सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात.
* 21 व्या शतकातील शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार धोरण आखत आहे. सरकार अधिकाधिक ई-वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे.
* अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था, बायोगॅस प्लांट, स्मार्ट एलईडी बल्बचा अधिक वापर व्हावा यासाठीच्या धोरणांवर सरकारकडून काम सुरू
* शहरातील नागरिकांनी वर्षातून किमान एकदा नदी उत्सव साजरा करावा. या महोत्सवात नदी प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करता येईल. त्याशिवाय नदी, पर्यावरणाचे महत्त्व आदीचे सांगता येईल. यानिमित्ताने जनजागृती मोहीम राबवता येईल
* पुण्याची ओळख ग्रीन फ्यूल सेंटर म्हणून निर्माण होत आहे.
* परदेशातील कच्च्या तेलाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
* या धोरणामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल
* सरकारांमधील समन्वयाच्या अभावी योजना रखडतात. या योजना पूर्ण होतात तेव्हा तेव्हा त्या कालबाह्य झालेल्या असतात. पीएम नॅशनल गती योजना प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रकल्प वेळेवर पूर्ण होणे आवश्यक
* समाजातील सर्व घटकांनी मेट्रोने प्रवास करावा. मेट्रोतून प्रवास करणे तुम्ही स्वत: च्या शहराला एक प्रकारे मदत करत असतात.
* येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा
https://youtu.be/bMxGXw43H2g