Breaking News

भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

301 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत त्यांनी चक्क राज्यपालांची तक्रार थेट मोदींनाच केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीसांच्या नंतर अजित पवार यांनी जनतेला संबोधन केलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आठ दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱ्यात “चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है”, असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावरून विरोध करण्यात आला.

‘मला पंतप्रधान यांना लक्षात आणून द्यायचं आहे की, काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे. शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा मोठा वारसा आहे, त्याचे पालन केले पाहिजे. तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे. याबद्दल मनात आकस न ठेवता वारसा पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भर सभेत तक्रार केली.

https://youtu.be/bMxGXw43H2g

Share This News
error: Content is protected !!