अधिवेशनात रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा, “मला बोलूद्या नाही तर मी फाशी घेईन”

421 0

शाई फेक प्रकरणात राणा यांना अटक होणार होती मात्र न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यानंतर आयुक्त आणि पोलीस आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका राणा यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केलेत. पोलीस आयुक्तांनी दबावाखाली येऊन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप राणा यांनी केलाय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरुन निर्माण झालेला वाद आणि महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणामुळे आमदार रवी राणा वादात सापडले आहेत. आष्टेकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात रवी राणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय.मात्र राज्य सरकारमधील काही नेत्यांचा मुद्दाम मला अडकवण्याचा डाव होता त्यामुळे संबंधितांवर कारवाई करा असे आज विधानभवनात निदर्शने करत राणा यांनी सांगितले.शाईफेकीच्या घटनेवेळी मी दिल्लीत होतो. असं असतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी आता अमरावती पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी रवी राणा यांनी केली.
दरम्यान रवि राणा यांच्यावरील कारवाईवरून विधानसभेमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. “मला बोलूद्या नाही तर मी फाशी घेईन” असा आक्रमक पवित्रा रवी राणा यांनी घेतला आहे.

Share This News

Related Post

ST Video

ST Video : एसटीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; हातात छत्री धरून बस ड्रायव्हरला चालवावी लागली बस

Posted by - August 25, 2023 0
गडचिरोली : सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही ठिकाणी अजूनही काही लोक पाऊसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे…

पुणे : बालगंधर्व चौक येथे रस्त्यावर ऑईल सांडल्याने रस्ता झाला निसरडा; अपघात टळले

Posted by - December 23, 2022 0
पुणे : आज शुक्रवारी बालगंधर्व चौकात मोठ्या प्रमाणावर तेल सांडल्याने रस्ता निसरडा झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी माती टाकून धोका…

पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळाली धक्कादायक माहिती

Posted by - July 23, 2023 0
पुणे- पुणे शहरात पोलिसांनी (Pune Police)दोन दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केली होती. हे दहशतवादी दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. या…
Beed News

Beed News : नवरात्रीच्या सुरुवातीला कुटुंबावर काळाचा घाला ! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नांत तिघांनी गमावले प्राण

Posted by - October 15, 2023 0
बीड : बीडमध्ये (Beed News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी गेलेले सख्खे बहीण-भाऊ पाण्यात…

‘त्या’ व्हाट्सअप मेसेजमुळे रजनी कुडाळकर आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

Posted by - April 19, 2022 0
मुंबई- शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी काल , सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *