उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

122 0

उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग येणे, त्वचेला खाज येणे असे त्रास होऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान वाढत असल्याने शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल बिघडल्याने देखील त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःची काळजी जाणून घ्या

* आहारात जास्तीत जास्त प्रमाणावर फळे खावी त्यात पाण्याचा अंश जास्त असतो. फळे, फळांचा रस, ताक, भाज्यांचा रस, सूप इत्यादी पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करावा.
* सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण याव्यतिरिक्त दर दोन ते तीन तासांनी नाश्ता म्हणून फळे खावीत यामुळे शरीरातील उष्णता आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत होते.
* नाश्त्यामध्ये सर्वात प्रथम फळे आणि नंतर प्रथिने असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश व्हायला हवा. दोन्ही वेळच्या जेवणात चौरस आहार असायला हवा चपाती, भाजी, डाळ, कोशिंबीर हे सर्व पदार्थ ताटात असावेत.
* उन्हाळ्यात पापड, भजी असे तेलकट पदार्थ शक्यतो घेऊ नये. सोबत दोन चार खजुर ठेवावेत त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
* उन्हाळ्यात थोडासा व्यायाम करावा,अनेकदा उन्हाळा वाढला म्हणून व्यायामाला सुट्टी देतात तसे न करता जर उन्हाचा त्रास होत असेल तर घरातल्या घरात व्यायाम करावा यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
* उन्हात घराबाहेर जाताना त्रास होऊ नये म्हणून चेहरा आणि डोकं झाकण्यासाठी टोपी, स्काफ,छत्रीचा वापर करावा.

Share This News

Related Post

महाविकास आघाडीचा आज महामोर्चा; थोड्याच वेळात होणार मोर्चाला सुरुवात

Posted by - December 17, 2022 0
महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड…

#VIRAL VIDEO : नवऱ्यामुलाच्या मोठ्या भावाला हार घालायला गेली नवरीची बहीण; व्हिडीओ पाहून हसणे थांबवू शकणार नाही !

Posted by - March 2, 2023 0
लग्नाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असते. विशेषत: मुला-मुलींमध्ये अधिक चातुर्य दिसून येते. याचा पुरावा सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत पाहायला…
Bhagirath Bhalke

Bhagirath Bhalke : राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके BRS पक्षात करणार प्रवेश?

Posted by - June 25, 2023 0
पंढरपूर : मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके (Bhagirath Bhalke) यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) …

पुण्यातील पाणीप्रश्नी गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

Posted by - March 31, 2022 0
पुणे- पुणे शहरातील पाणीप्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने संपवले जीवन

Posted by - November 14, 2023 0
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *